- Table View
- List View
Lakshmichi Mahanata
by Mukesh NadanThis is the story of goddess Lakshmi and Jayeshtha. Jayeshtha is jealous because Goddess Laksmi is welcome everywhere. People welcome her because she brings prosperity and wealth into the homes of people. Both are sisters. Jayeshtha tries to defeat Lakshmi but she fails her and gains more popularity.
Lal Gay
by Dinakar BorikarOne shepherd had one daughter named Radha and a son named Ram. They had a step mother and a step-sister. Their step mother was very harsh with them. Radha and Ram were taken care by a cow, her name was lal guy. The cow was sacrificed out of jealousy. Radha got married to a Prince because of this cow.
Lal Topadevali Poragi
by Sau. Leela ShindeThis is a story of a girl. Her grandmother had given her a nice red cap. One day while going to meet her ailing grandmother a fox deceives her in jungle. He swallows her grandmother and sleeps on the bed pretending to be her grandmother. Later he swallows her as well. A hunter passing by comes in for a courtesy visit to the grandmother and rescues both of them. They kill the wicked fox.
Landaga Ni Kokaru
by Ramkrushna ChaudhariThe story of the lamb and the foxy. One day lamb was thirsty and went to the river. He saw a fox, he was dangerous. Fox scared him.
Lassi, Ice Cream Ki Falooda?
by Mala Kumar Manisha Chaudhryलस्सीपेक्षा कैरीचं पन्हं चांगलं? का या दोन्हींपेक्षा फालुदा छान? सगळंच घेऊन बघा ना! मिनू तरी दुसरं काय करत्येय? उन्हाळ्यात असंच काहीतरी करायचं असतं.
The Last Don: द लास्ट डॉन
by Mario Puzoकोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची... फार कशाला, साऱ्या जगाची डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं', तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां'चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बऱ्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द लास्ट डॉन' ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.
Lavangi mirchi
by Purushottam DhakrasThis is a story of Lavangi a bitch. She was very tiny yet powerful her barking was very sharp and irritating. One day she managed to drive away a tiger and she became famous. One businessman kidnapped her because he liked her but the bitch returns to her owner.
The Law Of Attraction - Aakarshanacha Niyam: द लॉ ऑफ अट्रॅक्शन: आकर्षणाचा नियम
by Esther and Jerry Hiksया पुस्तकात अब्राहम यांच्या मूळ शिकवणुकीची शक्तिशाली पायाभूत तत्त्वं सांगितली आहेत. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी या सर्वांत शक्तिशाली 'वैश्विक आकर्षणाच्या नियमा'च्या कार्यामुळे कशा घडतात, हे या पुस्तकातून तुम्हाला कळेल. "Like attracts like", "Birds of a feather flock together" किंवा "It is done unto you as you believe." अशी इंग्लिश वाक्यं आपण ऐकलेली असतात. थोडक्यात, 'सारख्याकडे सारखं ओढलं जातं.' हे आपल्याला माहीत असतं आणि या 'आकर्षणाच्या नियमाबद्दल' याआधी काही थोर विद्वानांनी ओझरतं लिहिलंही आहे. मात्र, ईस्थर आणि जेरी हिक्स या बेस्टसेलर लेखकद्वयींच्या या पुस्तकात हा नियम जितक्या स्पष्टपणे आणि प्रत्यक्षात अनुसरण करण्याजोग्या पद्धतीने समजावून सांगितला आहे तितका तो याआधी कोणीही सांगितलेला नाही. या पुस्तकातून तुम्ही सार्वकालिक वैश्विक नियम काय आहेत आणि त्यांचा वापर आपल्या उन्नतीसाठी कसा करून घ्यायचा हे शिकाल. या पुस्तकातलं ज्ञान तुम्ही अंगी बाणवून घेतलंत की, तुमच्या दैनंदिन जीवनातले अंदाज, शक्यता, भाकितं असे अनिश्चित प्रकार लुप्त होतील आणि अखेर आता तुम्हाला तुमच्या जीवनातील व तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कशी घडते याचं ज्ञान होईल. तुम्हाला मनापासून कराव्या वाटणाऱ्या गोष्टी आनंदानं करायला आणि मिळवायला हे पुस्तक तुम्हाला मदत करेल.
Layakipramane Shiksha
by Ravindra KolheAccording to the rule of the words of the wise man, Birbal has punished four different criminals who commit the same kind of punishment. Upon asking the reason, why he did so? Birbal asks the king to send a spy after all criminal separately. Later they find out that what Birbal did was correct.
Lobhacha Bali
by P. G. SahasrabuddheThis is a story of a priest. He was very greedy and had the lust of wealth. One day while traveling he heard a tiger telling him that he had a golden bangle and he wants to give it to the man. The priest because of greed falls into the trap and gets killed.
Lok Kavi Shahir Ramjoshi: लोककवी शाहीर रामजोशी
by Shirish Gandheमहाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अशा व्यक्तींची साधारणतः शंभर ते सव्वाशे पानाची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती “महाराष्ट्राचे शिल्पकार” या योजनेअंतर्गत पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याची मंडळाने योजना आखली असून या चरित्रग्रंथमालेतील “लोककवी शाहीर रामजोशी” हा तेविसावा चरित्रग्रंथ आहे. लोककवी शाहीर रामजोशी हा शाहिरांचा मुकूटमणी आहे आणि म्हणूनच “महाराष्ट्राचे शिल्पकार” या मंडळाच्या चरित्रग्रंथमालेअंतर्गत या शाहिरावरचा चरित्रग्रंथ प्रकाशित करण्यात मंडळाला विशेष आनंद होत आहे. प्रा. शिरीष गंधे यांनी या चरित्रग्रंथाचे लेखन समरसून तर केलेले आहेच; पण त्याशिवाय चरित्रग्रंथासाठी रूढ असलेल्या लेखन पद्धतीचा अवलंब न करता कथात्मक लेखन पद्धतीचा अवलंब केला आहे. प्रसंगाची मांडणीही अतिशय नाट्यपूर्ण रीतीने केलेली आहे. अर्थात अशा लेखन पद्धतीचा अवलंब केल्यास चरित्रग्रंथात काही त्रुटी संभवतात; पण या ग्रंथात अशा त्रुटी अभावानाच आढळतात.
Lokasankhya Va Samaj SY BA Pune University
by DR Sudhir Yevle Jyoti S. GagangrasLokasankhya Va Samaj S.Y.B.A. Pune University text book for second year from The Pune Universtity in Marathi.
Lokjivan Ani Loksanskruti: लोकजीवन आणि लोकसंस्कृती
by Dr D. T. Bhosaleभारतीय उपखंडात प्रगत अशा अनेक ‘जीवनपद्धती’ नांदत होत्या. या विविध संस्कृती सिंधू, सैंधव, आदिम, द्रविड इ. नावाने ओळखल्या जात होत्या. प्राचीन ऐतिहासिक श्रमण संस्कृती अत्यंत समृद्ध आणि परमत्याग करुणेवर आधारित होती. “लोकजीवन आणि लोकसंस्कृती” या ग्रंथातून मराठी साहित्याला एक अप्रतीम देशीकार लेणे लाभत आहे. भारतीय समृद्ध शांतिप्रिय लोकजीवनाची ओळख या ग्रंथातून होत असतानाच मराठी वाचकांना आपल्या जीवनपद्धतीचा नवा अविष्कार घडल्याचा आनंद होईल.
Lokprashasan 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: लोकप्रशासन १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Haridas Arjun Jadhav Pramod Rajendra Tambe Swati Kuradeशैक्षणिक वर्ष 2021-2022 टी.वाय.बी.ए. सत्र - 5 च्या राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर - 3, CBCS पॅटर्नच्या Discipline Specific Elective Course (DSE 1 C (3) + 1) साठी 'लोकप्रशासन' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'लोकप्रशासन' या उपविद्याशाखेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेची विध्यार्थ्यांना ओळख करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. यातून विध्यार्थ्यांना लोकप्रशासनाचे विविध दृष्टिकोन, लोकप्रशासनातील सिद्धान्त आणि मूलभूत संकल्पना समजून घेता येणार आहेत. लोकप्रशासन या अभ्यासक्रमाच्या सत्र पाचमध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'लोकप्रशासन' हे असून यामध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व यांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण 'नव-लोकप्रशासन' हे असून यामध्ये आपण नव-लोकप्रशासनाचा उदय, नव-लोकप्रशासनाची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे समजून घेणार आहोत. तिसरे प्रकरण आहे 'लोकप्रशासनाचे दृष्टिकोन'. या प्रकरणात आपण लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे पारंपरिक, वर्तनवादाचा व्यवस्था दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण आहे 'शासन'. यामध्ये आपण सुशासनाची संकल्पना, ई-प्रशासन आणि सार्वजनिक - खासगी क्षेत्र भागीदारी समजून घेणार आहोत.
Lokprashasan 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: लोकप्रशासन २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Haridas Arjun Jadhavशैक्षणिक वर्ष 2021-2022, टी. वाय. बी. ए.: सत्र 6 च्या राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर 3, CBCS पॅटर्नच्या Discipline Specific Elective Course (DSE 1 C(3)+1) साठी 'लोकप्रशासन' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'लोकप्रशासन' या उपविद्याशाखेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेची विद्याथ्यांना ओळख करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. यातून विद्याथ्यांना लोकप्रशासनाचे विविध दृष्टिकोन, लोकप्रशासनातील सिद्धान्त आणि मूलभूत संकल्पना समजून घेता येणार आहेत. लोकप्रशासन या अभ्यासक्रमाच्या सत्र सहामध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'नोकरशाही' हे असून यामध्ये आपण नोकरशाहीची भूमिका, नियुक्तीकर्ते- सेवक संबंध, प्रशासकीय न्यायाधीकरण आणि प्रशासकीय निवाडा यांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण 'कर्मचारी प्रशासन' हे असून यामध्ये आपण कर्मचारी प्रशासन, प्रशासकीय भरती, प्रशिक्षण आणि बढती या संकल्पना समजून घेणार आहोत. तिसरे प्रकरण आहे 'अंदाजपत्रकीय प्रक्रिया'. या प्रकरणात आपण वित्त प्रशासन, अंदाजपत्रकाचे प्रकार आणि अंदाजपत्रकीय प्रक्रिया अभ्यासणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण आहे 'उत्तरदायित्व आणि नियंत्रण'. यामध्ये आपण उत्तरदायित्व आणि नियंत्रण या संकल्पनांबरोबरच प्रशासनावरील नियंत्रण या बाबी समजून घेणार आहोत.
Loksankhya Ani Bhartiya Samaj Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: लोकसंख्या आणि भारतीय समाज पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Jyoti Gagangras Dr Sudhir Yevaleसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'समाजशास्त्र' अभ्यासमंडळ यांनी 'समाजशास्त्र' द्वितीय वर्षे सर्वसाधारण अभ्यासक्रम नुकताच पुनर्रचित केला. याच अभ्यासक्रमावर आधारित लोकसंख्या आणि भारतीय समाज हे पुस्तक आहे. यावर्षी एस.वाय.बी.ए. चे विद्यार्थी क्रेडिट सिस्टिमला सामोरे जाणार आहेत, त्यामुळे सेमिस्टर 3 व सेमिस्टर 4 अशी लोकसंख्या आणि भारतीय समाज या अभ्यासक्रमावर आधारित दोन पुस्तके वेळेवर उपलब्ध केली आहेत. नेहमीप्रमाणेच साध्या, सुटसुटीत व आकलनास सोप्या भाषेत पुस्तकाची मांडणी केली आहे. समकालीन अनेक मुद्द्यांचा समावेश यावेळी काही प्रकरणात आहे. त्याबद्दलची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे वृत्तपत्रे, शासकीय माहिती, काही संशोधन पत्रिका, पेपर्स याचा आधार माहितीचे स्रोत म्हणून घेतला आहे. शाब्दिक अवडंबर टाळले आहे मात्र गुणवत्तेशी कोठेही तडजोड केलेली नाही.
Loksankhya Ani Samaj Parichay Paper 2 SYBA Third Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Sudhir Yevale Jyoti Gagangrasसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'समाजशास्त्र' अभ्यासमंडळ यांनी 'समाजशास्त्र' द्वितीय वर्षे सर्वसाधारण अभ्यासक्रम नुकताच पुनर्रचित केला. याच अभ्यासक्रमावर आधारित लोकसंख्या आणि समाज परिचय हे पुस्तक आहे. यावर्षी विद्यार्थी क्रेडिट सिस्टिमला सामोरे जाणार आहेत त्यामुळे सेमिस्टर-3 व सेमिस्टर-4 अशी लोकसंख्या आणि समाज परिचय या अभ्यासक्रमावर आधारित दोन पुस्तके वेळेवर उपलब्ध केलेली आहेत. नेहमीप्रमाणेच साध्या, सुटसुटीत व आकलनास सोप्या भाषेत पुस्तकाची मांडणी केली आहे. समकालीन अनेक मुद्द्यांचा समावेश यावेळी काही प्रकरणात आहे. त्याबद्दलची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे वृत्तपत्रे, शासकीय माहिती, काही संशोधन पत्रिका, पेपर्स याचा आधार माहितीचे स्रोत म्हणून घेतला आहे. शाब्दिक अवडंबर टाळले आहे मात्र गुणवत्तेशी कोठेही तडजोड केलेली नाही.
Loksankhya Bhugol Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: लोकसंख्या भूगोल पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More Prof. Dilip Dnyaneshwar Muluk Dr Snehal Nivruti Kasarसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात विशेष स्तरावर 'लोकसंख्या भूगोल' हा विषय समाविष्ट केलेला आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने लोकसंख्या ही एक संपदा आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक त्याचबरोबर लोकसंख्याविषयक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर व वाढीवर होत असतो. त्याहूनच विविध प्रदेशात लोकसंख्येची रचना तयार होते. लोकसंख्या ही एक संपदा असली तरी साधनसंपदेच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास संपदेवर अधिक ताण पडून दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. लोकसंख्या व भौगोलिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना आणि आपल्या देशातील लोकसंख्याविषयक अभ्यास मांडणी करताना अतिशय सोप्या भाषेचा वापर करून अभ्यासकांच्या हाती हे पुस्तक देण्याचा हेतू या पुस्तकाने साध्य केला आहे.
Loksankhya Bhugol Paper 1 SYBA Third Semester - SPPU
by Abcसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विशेष स्तरावर हा ‘लोकसंख्या भूगोल’ विषय लागू केला आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने लोकसंख्या ही एक संपदा आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक त्याचबरोबर लोकसंख्याविषयक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर व वाढीवर होत असतो. त्याहूनच विविध प्रदेशात लोकसंख्येची रचना तयार होते. लोकसंख्या ही एक संपदा असली तरी साधनसंपदेच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास संपदेवर अधिक ताण पडून दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. 'लोकसंख्या' या विषयावर अनेक भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत. लोकसंख्या व भौगोलिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना आणि आपल्या देशातील लोकसंख्याविषयक अभ्यास मांडणी करताना अतिशय सोप्या भाषेचा वापर करून अभ्यासकांच्या हाती हे पुस्तक देण्याचा हेतू या पुस्तकाने साध्य केला आहे.
Lokshahir Anna Bhau Sathe Nivadak Wangmay: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय
by Vasundhara Pendse-Naikप्रतिभेला रंग, रूप, वर्ण, वंश, जातपात वा लिंगभेद ह्यांची कुंपणे नसतात. ती स्फुरते कुणाही सहृदयाला, अनुभूतिपूत अस्वस्थ आत्म्याला. प्रतिभेचे आजच्या औपचारिक शिक्षणावाचून तरी कुठे अडते? विश्वाच्या शाळेतील उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या व्यवहारातून शिकलेले पाठच तिला भावतात, पावतात. शाहीर अण्णा भाऊ साठे हे वरील निकषांचे जागते उदाहरण होय. ते जसे जगले, त्याला जागले. ते लिहायला लागले आणि लिहीतच राहिले. साहित्यात त्यांनी आपले आगळे स्थान मिळवले. अण्णा भाऊंचे सगळेच साहित्य मोलाचे. जीवनाला उपयोगाचे. नव्या पिढीला प्रेरक ठरायचे. पण प्रचंड व्यासाचे. बरे ते इतर प्रकाशकांनी पुनःपुन्हा जनतेसमोर आणलेले. म्हणूनच अण्णा भाऊंचे आगळेपण सिद्ध करणारे निवडक साहित्य व त्याबाबतचे काही विचक्षण आलेख महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे.
Lost Horizon: लॉस्ट होरायझन
by James Hiltonजिथं काळ निश्चल राहतो! हिमालयीन पर्वतांच्या उंच भिंती असलेल्या एका दूरवरच्या तिबेटियन दरीत स्वप्नातीत असा शांग्रिलाचा मठ आहे. भारतातून अपहरण करून आणलेलं विमान कोसळल्यावर, ह्यूज कॉन्वेला त्या शांग्रिलाच्या मठात आणलं जातं. तिथे त्याला काहीतरी गूढपणा जाणवतो. हे उड्डाण कोणी नियोजित केलं होतं? असं कोणतं रहस्य होतं जे त्या आदरणीय लामाने दडवून ठेवलं होतं? पियानोसारखं वाद्य वाजवणारी ती सुंदर चिनी मुलगी ह्या अशा विचित्र जागी कशी आली? हळूहळू कॉन्वेला ते असंभवनीय सत्य कळतं... तुम्ही ‘लॉस्ट होरायझन’ ह्या पुस्तकात पार गुंगून जाल.
The Lost Symbol: द लॉस्ट सिम्बॉल
by Dan Brownफ्रीमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होता. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता. पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामथ्र्य प्राप्त करून घ्यायचे होते. पिढ्यानपिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली; तिच्यावरून आता खून, हिंसा, छळ सुरू झाले. ते एवढ्या थराला पोहोचले की, शेवटी अमेरिकेची शासनव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली. मग चोवीस तासांत एक थरारक व रोमहर्षक नाट्य सुरू झाले… रेल्वे, हेलिकॉप्टर यांमधून सीआयएच्या माणसांनी पाठलाग सुरू केले… सरकारची नाडी आता खुनी माणसाच्या हातात आली होती! त्याला स्वत:ला ‘देव’ बनायचे होते. त्यातून मग प्राचीन विद्या, धर्मग्रंथ, कुणाचेतरी बळी अशा घडामोडी घडत गेल्या… शेवटी यातून माणसाने गमावलेले ‘ते चिन्ह’ त्याला गवसले का?... चोवीस तासांतील या घटना तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. डॅन ब्राऊनच्या इतर तीन कादंबऱ्यांएवढीच ही एक अगदी अलीकडची उत्कंठावर्धक कादंबरी!
Maajhe Mitra
by Rukmini Banerjiमला खूप मित्र आहेत. मला ते सर्व आवडतात. पण त्यांच्यातला एक मला सर्वात जास्त आवडतो.
Maaloo Aani Kaaloo
by Vinita Krishnaएके दिवशी मालूला बागेतून बटाटे आणायचे होते. त्याला कोणी मदत केली? कालूने! मालू-कालूची ही गोष्ट वाचा!