- Table View
- List View
Aantararastriya Arthashastra TY BA Pune University
by G. J. Lomate DR D. G. Ushir R. K. DatirAantararastriya Arthashastra Marathi text book for Third year from The Pune Universtity in Marathi.
Aaplyala Kaajwyansarkhe Chamchamtaa Kaa Yet Naahi?
by Nabanita Deshmukhतुम्हाला माहीत आहे का, काजवे का चमकतात? गंमत म्हणजे काजव्यांची बाळं आपल्या प्रकाशाचा उपयोग शत्रूला दूर पळवण्यासाठी करतात. या पुस्तकात बुडी मारलीत तर चमचम करत, अंधार उजळून टाकणाऱ्या काजव्याविषयी आणखीही बऱ्याच गमती कळतील.
Aarogya Va Sharirik Shikshan Class 11 - Maharashtra Board: आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneआरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पुस्तकात शारीरिक सुदृढता विकसन, स्थूलता, निसर्ग व आहार, योग आणि मुद्रा, उत्तेजक द्रव्ये, दुखापतीचे व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाकडून सक्रियतेकडे, खेळातील व्यवसाय संधी, विविध खेळ, विविध क्रीडा स्पर्धा, खेळाडूंच्या यशोगाथा या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण असून उद्याच्या आरोग्यसंपन्न व उद्यमशील भारताचे आदर्श नागरिक आपण बनणार आहात. यासाठी शरीराबरोबरच मनाचीही तयारी असणे गरजेचे आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रित असावी, कृतिप्रधानता व ज्ञानरचनावादावर भर दिला जावा, शारीरिक सुदृढतेच्या किमान क्षमता प्राप्त कराव्यात, तसेच शिक्षणाची प्रक्रिया रंजक आणि आनंददायी व्हावी हाच दृष्टिकोन समोर ठेवून या पाठ्यपुस्तकाची रचना केली आहे.
Aarogya Va Sharirik Shikshan class 12 - Maharashtra Board: आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneआरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. व्यायाम व आरोग्याची जाणीव निर्माण होण्यासाठी तसेच योग्य सवयी लागण्यासाठी त्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. भावी आयुष्य निरामय होण्यासाठी योग्य व्यायाम, आहार, खेळ व कृतिशील जीवनशैली याची सवय लागावी हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा आयुष्यभर व्यायाम वर्तनाचा विकास घडवणारा, मानवी हालचालींचे ज्ञान देणारा, खेळातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास प्रवृत्त करणारा, 'स्व' ची जाणीव निर्माण करून देणारा व विद्यार्थ्यांना खेळ-क्रीडा, मनोरंजन यांच्या परस्पर संबंधाविषयी माहिती देणारा आहे. सुदृढ शरीर व उत्तम मानसिक स्वास्थ्य या दोन्हींचा विचार करून आवश्यक असलेली माहिती या पाठ्यपुस्तकात कार्यपुस्तिकेच्या स्वरूपात दिली आहे. विद्यार्थ्यांचे क्रीडाकौशल्य विकसित व्हावे व उपक्रम करताना त्यांचे मनोरंजन होऊन आनंद मिळावा व त्यामागची शास्त्रीय माहितीही मिळावी हा दृष्टिकोन ठेवून लेखन केले आहे.
Aarsa
by Meenakshi SardesaiThis is a story of Prince Pavan. He was about twenty-two years and everybody was looking for good match for him. The condition was that the girl image should look spotless in the magical mirror. Pavan Kumar was humble, kind and tolerant. Sagar Gupta secretariat gave him the knowledge of the state. It is a matter of selflessness, how to handle the welfare of the people, how to keep peace in the state, and also how to give justice. So they wanted a wife with a similar character. Chaiti was a poor girl from a village and she fulfilled all the requirement and married Prince Pawan.
Aarthik Bhugol 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: आर्थिक भूगोल १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Amit Eknath Sonawane Prof. Shivram Mahadu Korde Dr Vasudev Shivaji Saluke Prof. Dilip Dnyaneshwar Muluk'आर्थिक भूगोल' हे पुस्तक आपल्या असंख्य वाचकांचे हाती देताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. प्रथम सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गास हा विषय विशेष स्तरावर लागू केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. कारण दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धांमुळे 'आर्थिक भूगोल' या विषयाचे महत्व देखील वाढत आहे. 'आर्थिक भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्वाचा उद्देश हा विषय सुरू करताचा आहे.
Aarthik Bhugol 1 SYBA Third Semester - SPPU: आर्थिक भूगोल १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by A. B. Savadi P. S. Kolekarसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) SYBA Geography (G-2) Semester 3 साठी (जून 2020 पासून) 'आर्थिक भूगोल' विषय अभ्यासाकरिता आहे. आर्थिक भूगोल ही मानवी भूगोलाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण शाखा आहे. पर्यावरणातून प्राप्त झालेली साधनसंपत्ती आणि मानवी आर्थिक क्रिया यामधून जसा साधनसंपत्तीचा विकास झाला त्याचबरोबर पर्यावरणातील अविवेकी मानवी हस्तक्षेपामुळे काही पर्यावरणीय समस्याही निर्माण झाल्या आहेत. आर्थिक विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. यासाठी साधनसंपत्तीचा वापर अनिवार्य आहे. साधनसंपत्ती आणि मानवी आर्थिक यांचा आपणास परिचय व्हावा या दृष्टीने विद्यापीठाने 'आर्थिक भूगोल' हा विषय द्वितीय वर्ष कला-सेमिस्टर-3 साठी भूगोल विषयाच्या अध्ययनासाठी निश्चित केला आहे.
Aarthik Bhugol 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: आर्थिक भूगोल २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Arjun Haribhau Musmade Dr Rajesh Tryambak Birajdar Dr Babasaheb Kachru Vani Dr Santosh Anil Bhailumeसावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने एस.वाय.बी.ए. या वर्गास 'आर्थिक भूगोल 2' हा विषय सामान्य स्तरावर लागू केला आहे. 'आर्थिक भूगोल 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तकातून व्यापार आणि वाहतूक तसेच उद्योगधंदे या आर्थिक क्रियांचा सविस्तर आढावा घेतला आहे. तसेच वेगवेगळ्या प्रदेशांतील साधनसंपत्तीचे योग्य नियोजन करून प्रादेशिक विकास साधणे सहज सोपे आहे हे सोप्या भाषेत विद्यार्थी व शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण विकास साधनांना विविध शासकीय योजनांची काही प्रमाणात माहिती विद्यार्थी व शिक्षक या पुस्तकातून मिळवू शकतील.
Aarthik Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: आर्थिक भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. A. B. Savadi Prof. P. S. Kolekarसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) SYBA Geography (G-2) Semester - IV साठी (नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पासून) 'आर्थिक भूगोल - 2' विषय [Cg 210 (B)] हे क्रमिक पुस्तक विद्यार्थ्यांसाठी सादर केले आहे. मानवी भूगोलाची एक महत्त्वपूर्ण शाखा 'आर्थिक भूगोल' आहे. सेमिस्टर - IV मध्ये या शाखेच्या अभ्यासातून मानवी आर्थिक क्रिया विशेषतः वाहतूक व व्यापार, उद्योगधंदे, प्रादेशिक विकास आणि प्रादेशिक विकासातील असंतुलन, भारतातील ग्रामीण विकासाचे कार्यक्रम यांचा परिचय व्हावा या दृष्टीने विद्यापीठाने 'आर्थिक भूगोल – 2' हा विषय भूगोल अध्ययनासाठी निश्चित केला आहे.
Abbaji Gokhale Ek Anandyatri: आबाजी गोखले एक आनंदयात्री
by Sau. Swamini Vikram Savarkarश्री. पांडुरंग बळवंत उपाख्य आबाजी गोखले हे नागपूरच्या सार्वजनिक जीवनातील, एक विख्यात व्यक्तिमत्व होते. नाग-विदर्भात ते नर्मदा परिक्रमावासी पदयात्री म्हणून ओळखले जात. कारण त्यांनी श्री नर्मदा नदीची अत्यंत अवघड अशी परिक्रमा, अल्पकाळात पूर्ण केली. केवळ नर्मदा परिक्रमाच नव्हे, तर सर्व भारतभर त्यांनी पद भ्रमण केले. एका व्यक्तिने वर्षानुवर्षे कोणताही राजकीय हेतु किंवा आर्थिक अभिलाषा न बाळगता हजारो मैलांचा प्रवास, लोकनिरीक्षण, निसर्गाशी नाते जोडणे आणि या देशातील दुर्गम आदिवासी जनतेची ओळख करुन घेण्यासाठी करणे, हे क्वचित आढळणारे उदाहरण आहे. पर्यटनातील त्यांच्या विविध अनुभवांचा लाभ मराठी वाचकांना व्हावा यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आबाजींचे व्यक्तिमत्व व त्यांचे अनुभव हे पुस्तकरूपाने आले तर ते वाचकांना उपयुक्त होईलच पण मराठी साहित्यालाही एक वेगळा आयाम मिळेल. आबाजींच्या व्यक्तिमत्वाचे लेखन आणि त्यांनी केलेल्या शब्दांकनांचे आवश्यक ते संपादन करुन हे पुस्तक तयार केलेले आहे.
Abhas Ani Vastavata: आभास आणि वास्तवता
by Sau. Gargi Sardesaiख्रिस्तोफर कॉडवेल लिखित “ILLUSION AND REALITY” या पुस्तकाचा मराठी अनुवाद सौ. गार्गी सरदेसाई यांनी केला आहे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. जेमतेम तीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कॉडवेलचे स्पेनमधील यादवी युध्दात फ्रँको या हुकूमशहा विरुद्ध १९३७ साली लढताना निधन झाले तेव्हा त्यांच्या या ग्रंथांची छपाई सुरू होती. “आभास आणि वास्तवता” या शीर्षकाचा हा ग्रंथ काव्याच्या उगमासंबंधी कुतूहल असलेल्यांच्या तसेच आधुनिक इंग्रजी काव्य आवडीने वाचणाऱ्यांच्या विचारांना निःसंशय चालना देईल. प्रस्तुत ग्रंथ केवळ काव्यविषयक नसून काव्याच्या उगमासंबंधीही आहे. काव्य हे भाषेद्वारा लिहिले जाते, आणि म्हणून भाषेच्या उगमासंबंधी विचारही यात मांडला आहे.
Abhimanachi Leni - Novel: अभिमानाची लेणी - कादंबरी
by Devendra Bhujbalदेवेंद्र भुजबळ यांनी 'अभिमानाची लेणी' या पुस्तकात सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच 'राष्ट्रभक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सानेगुरुजींची शाळा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, बुद्ध वंदन, युगप्रवर्तक शाहू महाराज, उत्तम बंडू तुपे अशा महनीय व्यक्तिंची विविध क्षेत्रातील कामगिरीची माहिती वाचकांसमोर मांडली आहे.
Abhyantar - Novel: अभ्यंतर - कादंबरी
by Vinita Deshpandeअभ्यंतर या कादंबरीचे विशेष म्हणजे ती समाजव्यवस्थेवर आधारित असून आजच्या काळात या विषयावर विचार करायला लवणारी आहे. सम्राट अशोकने अखंड भारतावर दीर्घकाळ राज्य केले. तो एक शूरवीर योद्धा तर होताच, एक अनुशासित आणि सुनियोजित शासनव्यवस्थेसाठी त्याने केलेले प्रयत्न या कादंबरीत मांडले आहे. कलिंगयुद्धानंतर सम्राट अशोकच्या जीवनाचा या कथानकात घेतलेला आढावा, त्याची मनस्थिती, समस्त भारतात सर्वधर्मसमभाव साधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न आणि ज्ञानकोशाची गुंफण लेखिकेने लीलया गुंफली आहे. कथानकातील भाषाप्रयोग तुम्हाला गतकाळात घेऊन जातो.
The Accidental Prime Minister: द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर
by Sanjay Baru२००४ मध्ये संजय बारु यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाचा मुख्य संपादक म्हणून आपली कारकिर्द मागे सोडून युपीए-१ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ‘माध्यम सल्लागार’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी त्यांना ही नोकरी देताना असं म्हटलं होतं, ‘‘या कार्यालयात बसून माझा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येणार नाही. तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं, अशी माझी इच्छा आहे. माझ्या जे काही कानावर पडावं, असं तुम्हाला वाटत असेल, ते अजिबात न घाबरता, नि:पक्षपाती वृत्तीनं जसं असेल तसं मला सांगा!’’ ‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकामध्ये डॉ. सिंग यांच्याविषयीचं जनमत बनवणं हा अनुभव काय होता, हे त्यांनी सांगितलं आहे. पडद्यामागे घडणा-या भारतीय राजकारणाची नवीन दृष्टी त्यांनी आपल्या खिळवून टाकणा-या शैलीत वाचकाला दिली आहे. डॉ. सिंग यांचे ‘स्पिन डॉक्टर’ आणि चार वर्षं खास त्यांच्या विश्वासातले असलेल्या संजय बारु यांनी डॉ. सिंग यांचे त्यांच्या मंत्र्यांशी असलेले तणावपूर्ण संबंध, सोनिया गांधी यांच्याबरोबर असलेलं त्यांचं सावध समीकरण अगदी जवळून पाहिलं आहे. डाव्या पक्षांना हाताळतानाचं आणि अणुकराराचा पाठपुरावा करतानाचं डॉ. सिंग यांचं कौशल्यही त्यांनी पाहिलं आहे. ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटातील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं.
Achal Shraddha
by D. V. JoshiAcharya Arjun thought, he is the only best archer in the world. Eklavya had stopped the barking of a dog with an arrow without hurting the jaws." Surely this is an unusual archery job. "Who is better than me?" Arjun said with ego. "It's true, it's the best way." So he goes and finds Eklavya. He saw that he was talking to a statue. "What are you talking to the statue?" Arjun said, "Can you learn so many things only through imagination? Eklavya had made a statue of Arjun and through immense faith, he became the best archer. Such unshakable faith can turn the entire world down.
Acharya Bhagwat Sankalit Wangmay Khand 1: आचार्य भागवत संकलित वाङ्मय खंड १
by Achyut Keshav Bhagwatगांधीयुगात महाराष्ट्रात आचार्य जावडेकरांसारखे जे निष्ठावंत बुद्धिमंत निर्माण झाले त्यांतीलच आचार्य भागवत हे एक. त्यांनी केवळ सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानाचाच महाराष्ट्रात प्रचार केला नाही तर समाजवादाची मूलभूत तत्त्वेही जनसामान्यांपर्यंत पोचविली आणि महाराष्ट्राचे सर्वतोपरी प्रबोधन केले, एक संपूर्णपणे नवी पिढी घडविली. आचार्य भागवत हे विचारवंत तर होतेच, त्याचबरोबर ते उत्कृष्ट वक्तेही होते. अशा थोर व्यक्तीचे वाङ्मय दोन खंडांत संकलित करून प्रसिद्ध करण्याचे साहित्य संस्कृती मंडळाने ठरविले. प्रस्तुत ग्रथ हा त्यांतील प्रथम खंड होय. या पहिल्या खंडात अनेक विषयांवरील लेख आहेत. इस्लामची शिकवण, अध्यात्म आणि विज्ञान, स्त्रीचे समाजातील स्थान, ध्येयवादाचे विवेचन, समाजधारणेची नवी मूल्ये हे त्यांपैकी काही. मानवनिष्ठा व मानवप्रेम हे तर्ककर्कश आचार्यांच्या विचारांमागील मुख्यसूत्र. त्यातून त्यांच्या साऱ्या विचारांचे नवनीत विकसित होते.
Acharya Bhagwat Sankalit Wangmay Khand 2: आचार्य भागवत संकलित वाङ्मय खंड २
by Achyut Keshav Bhagwatआचार्यांची जीवनदृष्टी आणि त्यामागे असलेले तत्त्वज्ञान यावरच्या लेखांचे संकलन पहिल्या खंडात झाले. या दुसऱ्या खंडात प्रा. भागवत यांनी आचार्यांच्या साहित्यविषयक लिखाणाचे संकलन केले आहे. एका रीतीने हे आचार्यांचे साहित्य समीक्षाशास्त्रच होय. आचार्य भागवत यांची जीवन व साहित्य यांच्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी होती. त्यामुळे आचार्यांच्या लिखाणाचा हा दुसरा खंड महाराष्ट्रातील नवीन पिढीला नेहमीच स्फूर्तिप्रद होत राहील.
Adani
by Shankararav KharatAdani a story of illiterate man. he received a letter then he went to the school teacher . read story to find out what happens next.
Adhi Dyave Mag Magave
by Shankar KarhadeThis is a story of a village where people did not beg. Everybody in the village was prosperous and happy. One day a devotee of God comes to this village and starts begging for food and but nobody gives him anything. He goes to the main authority’s house and begs. He gets nothing so he calls them atheist. He is told that if he cannot give anything to anybody he should not ask anything from anybody. Since then, he stops begging.
Adhunik Bharat Isavi San 1886 Te 1947 SYBA Fourth Semester - RTMNU: आधुनिक भारत इ.स. १८८६ ते १९४७ बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Vibha Anil Athalyeराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वर्ष २०१६ पासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सेमेस्टर (सत्र) प्रणाली लागू केली आहे व त्यानुसार कला शाखेच्या सर्वच विषयात व अभ्यासक्रमात व्यापक फेरबदल केले आहेत. विद्यापीठाने तयार केलेल्या बी.ए.द्वितीय वर्ष : सेमेस्टर-IV च्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले 'आधुनिक भारत (इ.स. १८८६ ते इ.स. १९४७)' हे पाठ्यपुस्तक आहे. विद्यार्थ्यांना इतिहास विषयाच्या अध्ययनाची गोडी लागावी म्हणून प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत.
Adhunik Bharatacha Itihas (1857-1950) SYBA Third Semester - SPPU: आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९५०) एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Ganesh Raut Dr P. N. Shinde Pvt. A.G. Thoratपुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष (इतिहास) कला शाखेचा अभ्यासक्रम वर्तमानकाळाशी सुसंगत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातूनच हा नवा अभ्यासक्रम आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९५०) तयार करण्यात आला. यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचे हे नवे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. नवा अभ्यासक्रम आणि नवे पाठ्यपुस्तक असा दुहेरी योग या निमित्ताने जुळून आला आहे. आधुनिक भारताचे नव्याने झालेले आकलन आपणासमोर मांडले आहे. अभ्यासक्रमाची चौकट, पृष्ठसंख्येची मर्यादा, विद्यार्थ्यांची सोय या सगळ्याचा विचार करून पुस्तकाचे लेखन केले आहे. संकल्पनांचा अधिकाधिक विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे.
Adhunik Bharatacha Itihas (1858-1947) TYBA - SPPU: आधुनिक भारताचा इतिहास (१८५८-१९४७) टी.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Anil Kathareब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला असला तरी येथील अराजकतेचा फायदा घेऊन कंपनीने आपले राज्य स्थापन केले. कंपनीने भारत देशाचे आर्थिक शोषण सुरु केले. परंतु पुढे भारतीय लोकांमध्ये सामाजिक, राजकीय व आर्थिक जागृती झाली. यामधुनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली. यापूर्वीच इ. स. १८५८ मध्ये भारतावरील कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन व येथे ब्रिटनची सत्ता स्थापन झाली होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महात्मा मो. क. गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन केले. याच आंदोनालात क्रांतिकारक व स्त्रियांनीही महत्त्वाचे योगदान दिले. शेतकरी व आदिवासी लोकांनी केलेले उठाव व केलेल्या चळवळी सुध्दा महत्त्वाच्या ठरतात. संस्थानातील जनतेनेही प्रतिगामी राजवटींच्या विरोधात चळवळी केल्या होत्या. राष्ट्रीय चळवळीपासून मुस्लिम लिग दूर राहीली. यामधूनच पुढे पाकिस्तान या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. इ. स. १८५८ पासून इ. स. १९४७ पर्यंतचा भारताचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विविध स्पर्धा परीक्षा, एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी. व विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरणार आहे.
Adhunik Jag Bhag 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: आधुनिक जग भाग १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Jyoti Ganesh Rautद्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-3 [Discipline Specific Elective Courses (DSE-2A)] साठी सदर पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 2020-21 पासून 'आधुनिक जग' (आधुनिक जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन - भाग 1) हा भाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमात आणलेला आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासाला घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातून पाश्चिमात्त्य व पौर्वात्य जगात होत गेलेले बदल, तेथील नव्या व्यवस्थांची रचना, मूल्ये या गोष्टी अभ्यासता येणार आहेत. आधुनिक जगाच्या वाटचालीत प्रबोधन, स्वातंत्र्याच्या चळवळी, राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, राष्ट्रवाद, एकीकरण चळवळी, वसाहतवाद, साम्राज्यवाद, त्यांचे स्वरूप व त्यातून घडून आलेले पहिले महायुद्ध व त्याचे जगावर झालेले परिणाम फार महत्त्वाचे आहेत. आधुनिक जगाच्या इतिहासात 'औद्योगिक क्रांती व राष्ट्रवादाची संकल्पना ते पहिले महायुद्ध' हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यांचा अभ्यास आपल्याला या पुस्तकात करायचा आहे.
Adhunik Jag Bhag 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: आधुनिक जग भाग २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Ganesh D. Rautद्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-4 [Core Course-I (DSE- 2B)-3 Credit] साठी आधुनिक जग (आधुनिक जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन: भाग-२) पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासाला घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जगाचा इतिहास समजून घेता यावा म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जगाची तोंडओळख व्हावी असा दृष्टिकोन हे पुस्तक लिहिताना ठेवला आहे.
Adhunik Jagacha Ithihas 1920 te 1960 TYBA Sixth Semester - RTMNU: आधुनिक जगाचा इतिहास: १९२० ते १९६० बी.ए. षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. N. C. Dixitविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार आधुनिक जगाचा इतिहास: १९२० ते १९६० (Modern World: 1920-1960) हे बी. ए. तृतीय वर्षः सहावे सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'आधुनिक जगाचा इतिहास: १९२० ते १९६० (Modern World: 1920-1960)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये सोव्हिएट रशिया - पंचवार्षिक योजना, हिटलर - परराष्ट्र धोरण, मुसोलिनी - परराष्ट्र धोरण, चीन-जपान युद्ध (१९३७-१९३९), द्वितीय महायुद्धाची कारणे, संयुक्त राष्ट्रसंघ: रचना व कामगिरी, शीतयुद्ध, नाटो, सीटो, वॉर्सा करार, आशियाचे निर्वसाहतीकरण, इस्रायलची स्थापना, अलिप्ततेचे धोरण आणि सुवेज समस्या इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.