- Table View
- List View
Sona Aaila Madat Karte
by Vinita Krishnaसोना मूळचीच हुशार. तिनं आपल्या बाबांना कशी मदत केली, हे तुम्ही कदाचित वाचलं असेल. या गोष्टीत, आई जे काम करते आहे, तेच तिलाही करायचं आहे.
Soneri Hans
by Nirmala SaradaThere was a goose and it had golden feathers. The goose saw that an old lady and her family were going through a tough time. They were very poor. The goose made them rich by giving them one golden feather every week. After few days the old lady becomes greedy. She catches the goose and starts plucking all the feather and so happens that the feather loses its gold and becomes ordinary feathers. The goose warns the old lady for her greed and goes away.
Songadya Phasala
by Ramkrushna ChaudhariA fox was tired of hunting and eating every day. He wanted a hassle free life. He wears a sheep’s skin and starts staying with them. The shepherd unknowingly locked him along with the ship. The fox ate every day and stayed nicely. One day the shepherd receives some guest. He cuts this fox thinking it as a sheep.
Sonyacha sula
by Shrimati Tara ChudhariThe king asked Birbal, who is the honest and dishonest in this world? Birbal answer to the king that Dogs are trustworthy and son in law are not. The king passes an order that all the son-in-laws be crucified, but Birbal saves them all.
Sonyasarakhi Sandhi
by Shakuntala PhadanisIt is a story of married couple, Bhiva and Shevanta. Bhiva was a woodcutter. One day, He went to the forest for cutting the tree.While cutting one tree, an angel came and told not to cut this tree. Bhiva asked for something in return, so the angel gave him one bead. She said to him that makes three wishes before the sunset. Later Bhiva and Shevanta makes three wishes.
Speedpost: स्पीडपोस्ट
by Shobha Deआई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम... शरीराने आणि मनानेही काळजाशी घ्ट्ट बांधलेला! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशाच्या दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच शोषू पाहाणार्या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिमाण दिलं आहे. हादरे आणि आव्हानही दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावातात जगणार्या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी! गोंधळून टाकणार्या, जीवघेण्या स्पर्धेत लोटून उद्ध्वस्त करणार्या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं, अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे.
Steve Jobs: स्टीव्ह जॉब्झ
by Walter Issacson‘ज्या लोकांना असा वेडा विश्वास असतो, की ते जगही बदलू शकतात... तेच जग बदलतात.’ ‘अॅपल'च्या या जाहिरातीप्रमाणेच स्टिव्ह जॉब्सनं जग बदलून दाखवलं.’ त्याचीच ही कहाणी. जॉब्सच्या सुमारे ४० मुलखाती घेऊन लेखक वॉल्टर आयझॅक्सन यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. विलास साळुंखे यांनी या पुस्तकाचा रसाळ अनुवाद केला आहे. या सर्जनशील व्यक्तिमत्वामुळे सहा क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. ती म्हणजे कम्प्युटर, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्युटर आणि डिजीटल प्रकाशन व्यवसाय. जॉब्सच्या या कार्याचा आलेख पुस्तकात येतो. जॉब्स आणि त्याच्या कुटुंबियांच्या छायाचित्रांचा समावेशही पुस्तकात केला गेला आहे.
Sthool Arthashastra 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: स्थूल अर्थशास्त्र १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. B. Kale Dr G. K. Sanapसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेसाठी विशेष स्तरावर अर्थशास्त्र हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पेशल पेपर - 2 स्थूल अर्थशास्त्र भाग-1 साठी अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी आकृत्यांची विशेष आवश्यकता असते. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुबक आकृत्या व तक्ते देऊन विषय समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी, आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.
Sthool Arthashastra 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: स्थूल अर्थशास्त्र २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. B. Kale Dr S. R. Jawale Dr G. K. Sanapद्वितीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र हा विषय विशेष (Special) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थूल अर्थशास्त्र भाग-2 हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून स्थूल अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या घटकांचा सर्वसमावेशक अभ्यास व्हावा या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.
Sthool Arthashastra FYBA Second Semester - RTMNU: स्थूल अर्थशास्त्र बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. B.L. Jibhakateनवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत “स्थूल अर्थशास्त्र" ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्राध्यापक मित्र आणि व विद्यार्थ्यांना सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग १ च्या सेमिस्टर - II च्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिले असून ते महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. अर्थशास्त्रातील काही संकल्पना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. असा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून एकाच संकल्पनेकरिता मराठीतील अनेक पर्यायी नावे दिलेली असून इंग्रजीतील प्रतिशब्दही दिलेले आहेत. त्यामुळे परीक्षेत एखादी संकल्पना किंवा सिद्धांत वेगळ्या नावाने विचारण्यात आला तरी विद्यार्थांना त्याचे अचूक उत्तर देता येईल, असा विश्वास आहे.
Sthool Arthashastra S.Y.B.A. Pune University
by G. J. Lomate DR D. G. Ushir R. K. DatirSthool Arthashastra text book for Second year from The Pune Universtity in Marathi.
Sthool Arthashastrache Siddhant Bhag 1 SYBA Third Semester - RTMNU: स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग 1 बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr G. N. Jhamreविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग 1 (Macro-Economic Theory : 1) हे बी. ए. द्वितीय वर्षः तृतीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग 1 (Macro-Economic Theory : 1) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये युनिट १ - स्थूल अर्थशास्त्राची ओळख (Introduction to Macro Economics), युनिट २ - राष्ट्रीय उत्पन्न (National Income), युनिट ३ - मुद्रा आणि मुद्रेचे मूल्य (Money & Value of Money) आणि युनिट ४ - उत्पादन आणि रोजगार (Output & Employment) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.
Sthool Arthashastrache Siddhant Bhag 2 SYBA Fourth Semester - RTMNU: स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग २ बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr G. N. Jhamreविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग २ (Macro-Economic Theory : II) हे बी. ए. द्वितीय वर्षः चतुर्थ सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग २ (Macro-Economic Theory : II) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये युनिट १ - व्यापारी आणि केंद्रीय अधिकोष (Commercial & Central Bank), युनिट २ - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अधिकोषणातील नवीन उपक्रम (Reserve Bank of India & Innovation in Banking), युनिट ३ - वित्तीय बाजारपेठ (Financial Market), आणि युनिट ४- स्वास्थ्य अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रीय सांख्यिकी (Health Economics & Statistics for Economics) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.
Stutila Bhulala Ani Galat Phasala
by P. G. SahasrabuddheA group of foxes wanted to kill an elephant. An elderly fox goes to the elephant and deceives him by telling him that everybody wants to make elephant their king. The elephant on the way gets stuck deep in the mud. Seeing this the other foxes come and attack the elephant and kill it.
Suicha Janm
by Milind VataveOnce upon time man lived in the cave. One day he had helped a bird and bird taught him how to made a needle.
Sukh Hech Dukhache Mul
by Shankar KarhadeThere was a teacher and full of wisdom. One day his student asked him what is the root of misery. The teacher told him it is a difficult question to answer and said you yourself will find an answer one day. The teacher takes him to a city where he finds the city completely lit. When they come back home the student was trying to sleep in the dim light but could not sleep. He realizes that Happiness is the root cause of misery.
Sukhache Rajya
by S. R. DevaleRavan is killed and now Lanka is handed over to Ram’s brother Vibhishan. Ram and all others return to Ayodhya after the exile of 14 years. Bharat welcomes everybody and there is joy in the Kingdom. Peace prevails in the Kingdom.
Sukshma Arthashastra 1 Paper 1 SYBA Third Semester - SPPU: सूक्ष्म अर्थशास्त्र १ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. D. Awhad Dr S. R. Javale Dr D. B. Pawarद्वितीय वर्ष कला शाखेसाठी विशेष स्तरावर अर्थशास्त्र हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र स्पेशल - 1: सूक्ष्म अर्थशास्त्र भाग-1 साठी अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्दे देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासाठी आकृत्यांची विशेष आवश्यकता असते. आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुबक आकृत्या काढून विषय समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.
Sukshma Arthashastra 2 Paper 1 SYBA Fourth Semester - SPPU: सूक्ष्म अर्थशास्त्र २ पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Jawale Dr S. D. Awhad Dr D. B. Pawarद्वितीय वर्ष कला शाखेसाठीच्या सूक्ष्म अर्थशास्त्र (एस-1) भाग II साठी हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परिभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.
Sukshma Arthashastrache Siddhant Bhag 1 FYBA First Semester - RTMNU: सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग १ बी.ए. प्रथम वर्ष प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr G. N. Jhamreविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग - १ (Micro Economics Theory - 1) हे बी.ए. प्रथम सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली बी.ए. प्रथम सेमिस्टर करिता' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.
Sukshma Arthashastrache Siddhant Bhag 2 FYBA Second Semester - RTMNU: सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग 2 बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr G. N. Jhamreविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत भाग - 2 (Micro Economics Theory - 2) हे बी.ए. द्वितीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली बी.ए. द्वितीय सेमिस्टर करिता' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.
Sukshma Arthshastra SY BA Pune University
by Pro. DR. R. A. Datira Pro . R. M. ChintamaniSukhshma Arthshastra marathi text book fo SY BA for Pune university in Marathi.
Sulabh Gomant Bharati Marathi-Pustak Dusare class 6 - Goa Board: सुलभ गोमंत भारती मराठी-पुस्तक दुसरें इयत्ता सहावी - गोवा बोर्ड
by Shikshan Sanchalnalay Panaji Goaगोवा सरकारने नवीन अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये क्रमान्वित केल्यावर त्यावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने हाती घेतले. ह्या उपक्रमांत गेल्या वर्षी इयत्ता पाचवीसाठी सर्व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली. ह्याच मालिकेतील इयत्ता सहावीची पुस्तके ह्या वर्षी राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने तयार केली. त्यातील मराठी (तृतीय भाषा) विषयासाठी ‘सुलभ गोमंत भारती' पुस्तक दुसरे तयार करण्यात आले. हे पुस्तक तयार करताना विद्यार्थ्यांच्या गरजा व स्थानिक वातावरण ध्यानात घेण्यात आले आहे. पुस्तकाच्या प्राथमिक अवस्थेत गोव्यातील तीस शाळांतील मराठी विषय शिक्षकांनी ह्या पुस्तकाची उपयोगिता पडताळून पाहिलेली आहे.
Sulabh Gomant Bharati Pustak Pahile class 5 - Goa Board: सुलभ गोमंत भारती पुस्तक पहिले इयत्ता पाचवी - गोवा बोर्ड
by Shikshan Sanchalnalay Goa Sarkar Panaji Goaगोव्यातील शाळांसाठी इ. ५ वी ते ७ वी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून हा अभ्यासक्रम १९९४-९५ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येत आहे. सदर अभ्यासक्रम तयार करताना गोव्याची संस्कृती, इतिहास, सामाजिक व भौगोलिक वातावरण यांचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. म्हणूनच हा अभ्यासक्रम गोव्यातील परिस्थितीला अनुरूप असाच ठरावा. अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम गोवा राज्य शिक्षण शास्त्र संस्थेने हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणन यावर्षी इयत्ता पाचवीची सर्व पाठ्यपस्तके तयार करण्यात आली. त्यापैकी 'सुलभ गोमंत भारती, पुस्तक पहिले' हे पुस्तक आपल्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे. हे पाठ्यपुस्तक तृतीय भाषा-मराठी हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.