- Table View
- List View
Reshimgathi: रेशीमगाठी
by Kanchan Kashinath Ghanekarरेशीमगाठी पुस्तकातील काही लेख पूर्वी छापून आले असले, तरी ते जसेच्या तसे इथे छापलेले नाहीत. कारण ते लेख काही प्रसंगाने, संदर्भाने लिहिलेले असल्यामुळे ते आता कालबाह्य वाटण्याचा संभव होता. त्यामुळे त्यांचे पुनर्लेखन केले आहे. काही लेख छापताना काटछाट करून छापले गेले होते. ते या पुस्तकात पूर्ण स्वरूपात आहेत. पुस्तकात छायाचित्रांऐवजी रेखाचित्रे घालण्याचे ठरताच, ही कामगिरी श्री. वासुदेव कामत या निष्णात चित्रकारावर सोपविण्यात आली. या रेखाचित्रांसाठी लागणारी बरीचशी छायचित्रे आमच्या घरच्या संग्रहातीलच आहेत.
Revolution 2020: रिव्होल्यूशन २०२०
by Chetan Bhagatभारताच्या एका छोट्याशा गावात दोन हुशार तरूण होते. एकानं हुशारी वापरली पैसा मिळवण्यासाठी. दुसऱ्यानं हुशारी वापरली क्रांतीचा आरंभ करण्यासाठी. पण एक समस्या होती... दोघांचंही एकाच मुलीवर प्रेम होतं. ’रिव्होल्यूशन २०२०’ ही कथा आहे गोपाल, राघव आणि आरती या तीन बालमित्रांची वाराणसीत राहणाऱ्या या तिघांचा यश, प्रेम आणि सुख मिळवायचा संघर्ष या कादंबरीत चित्रित केला आहे. भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या या समाजात हे मिळवणं सोपं नसतं. गोपाल ’सिस्टम’ला शरण जातो तर राघव तिच्याशी दोन हात करतो... अखेर विजय कोणाचा होतो? चेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विश्वाशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे. ’फाईव्ह पॉईंट समवन’, ’वन नाईट द कॉल सेंटर’, ’द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ’टू स्टेटस’ नंतर ची ‘रिव्होल्यूशन २०२०’ ही कादंबरीही वाचकांना खिळवून ठेवेल. तुम्ही रिव्होल्यूशन करीता तयार आहात का?
Reward: रिवार्ड
by Baba Kadamमराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची गाजलेली कादंबरी Reward. उत्कंठावर्धक नाट्यने भरलेली कादंबरी.एक दिवस असा भयानक उजाडला, की तळाशी हे गाव धरणीकंप झाल्यासारखं हादरलं. गेल्या कित्येक वर्षांत या भागात जे घडलं नाही, ते घडलं! त्या दिवशी खून झाला आणि तोही तातोबाचा.त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास गुराख्याची मुलं माथाडीजवळ जनावरांना पाण्यावर घेऊन गेली होती. त्यांना अचानक ठो… ठो…ऽऽऽ असा आवाज आल्यामुळं भयभीत होऊन त्यांनी इकडंतिकडं पाहिलं, तर समोरून उंबराच्या झाडामागून तातोबा वेड्यासारखा धावत त्यांच्यासमोर आला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या गालातून आरपार अशी बंदुकीची गोळी गेली होती आणि त्याची संपूर्ण जीभ तुटली होती. ओठ आणि नाकपुड्या रक्तानं माखलेल्या होत्या.
Riksha Udali
by Ken Spillmanदिल्लीच्या वाहतूक कोंडीत त्रस्त झालेल्या एका रिक्षाला अचानक जादुई अनुभव येतो. रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासोबत तुम्हीही एक सफर करा. त्या चमचमत्या दुनियेचा हलका स्पर्श, तुम्हालाही नक्कीच आवडेल.
Rikta: रिक्त
by Mohana Prabhudesai Joglekar‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवेगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिस्थितीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
Ringo
by Vijaylakshmi Nagarajब्रम्हपुत्रेच्या किनारी काझीरंगा अभयारण्यात रिंगो नावाचे गेंड्याचे पिलू राहते. ते लाजरे आहे. मग ते सगळ्यांशी कशी बुवा मैत्री करेल?
Ritooche Laambalachak Patra
by Mala Kumarरितू आपल्या आतेभावाला भेटायला आतुर आहे.म्हणून ती त्याला एक पत्र लिहिते.
The Rozabal Line: दि रोझाबल लाइन
by Ashwin Sanghiदि रोझाबल लाइन ही रहस्यमय कादंबरी अनेक शतकांमधून आणि खंडांमधून उलगडत जाते. अश्विन सांघी गुंत्यांमधील वेटोळ्यांचा माग काढता काढता धर्माच्या रक्तरंजित जन्मापर्यंत पोचतात. लंडनमधील वाचनालयातील एका फळीवर पुठ्ठ्याचे एक खोके सापडते. गोंधळलेल्या ग्रंथपाल ते खोके उघडतात. ते खोके उघडताच त्यांच्या तोंडून किंकाळी फुटते आणि लगेचच त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतात. स्वतःला लष्कर-ए-तलतशार म्हणवणारं तेरा जणांचं सैन्य जगभर विखुरलेलं आहे. ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांचे दैव आणि या सैन्यातील सदस्यांचे दैव यांच्यात एक कुतूहलजनक साम्य आहे. त्यांचं ध्येय आहे आर्मागेडॉन. एका हिंदू ज्योतिष्याला आकाशातील विशिष्ट ग्रहांची युती जवळ आल्याचं लक्षात येतं. जगाचा अंत जवळ आल्याच्या जाणिवेने तो सुन्नपणे मान हलवतो. तिकडे तिबेटमध्ये एक बौद्ध भिक्खूंचा समूह ज्याप्रकारे त्यांच्या पूर्वजांनी ज्युदेआमध्ये ईश्वरपुत्राचा शोध घेतला होता त्याचप्रमाणे अवताराच्या शोधात निघतो. जेरुसलेममध्ये निर्माण झालेल्या या कोड्याची गुरूकिल्ली असते संघर्षाने ग्रस्त काश्मीरमधल्या रोझाबल नावाच्या एका कबरीत आणि ते कोडं सुटणार असतं वैष्णोदेवीत. एका अमेरिकन प्रिस्टला परिचित माणसांची अस्वस्थ करणारी दृश्यं दिसतात. फक्त ही दृश्यं आणि त्यातली लोकं कुठल्यातरी दुसऱ्याच काळात आहेत, असं त्याला वाटतं असतं.
Rumniya
by Rukmini Banerjiरुमनिमा आणि आजी ही मजेदार जोडी आहे, कारण त्यांना माहीत आहे शेवटी सगळं ठीकठाक होते. रुमनियाची ही सुंदर गोष्ट वाचा!
Rup Kaviteche TYBA Sixth Semester - SPPU: रुप: कवितेचे टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Dr. Shirish Landage Prof. Dr. Bhaskar Dhoke Prof. Dr. Sandeep Sangaleकविता हा एक प्रमुख साहित्यप्रकार आहे. या आदिम प्रकारामध्ये कालपरत्वे अनेक स्थित्यंतरे आली. या प्रवाहात कवितेची विविध रूपे, आविष्कार पाहावयाला मिळतात. हे कवितेचे बलस्थान असले तरी, कवितेचे स्वरूप, तिची संकल्पना आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करणेही जिकीरीचे झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर काही निवडक कवितांच्या आधारे विद्यार्थ्यांची आकलन, आस्वाद आणि विश्लेषणाची क्षमता विकसित करणे; कविता या साहित्यप्रकारातील विविध आविष्कार व भाषा रूपांची ओळख करून देण्याच्या उद्देशातून प्रस्तुत संपादन केले आहे.
Rusi Aani Pusi
by V. SuteyevThe story of a Rusi who had a cat named Puss. One day Rusi was drawing a picture of a house imagining Pussy to stay in the house. She was trying to make the house the way Pussy wanted.
Saang Na Lavkar- Hasne Radne
by Madhav Chavanआपल्या आजूबाजूला दिसणार्या रंग, आकार वगैरे अनेक गोष्टींबद्दल लहान मुलांना कुतूहल असते. मग ती मुले प्रश्न विचारतात आणि आई किंवा बाबा त्यांना उत्तरे देतात. 'सांग ना लवकर ... हसणे रडणे' यामध्ये अशीच छोटी छोटी प्रश्नोत्तरे आहेत.
Sabaja Ani Rakh
by Shrimati Tara ChaudhariThe story of a recluse and he saved from hanging to death, by Birbal cleverness.
Sadacharachi Shikavan
by Mukesh NadanThis is the story of king Harishchandra. He got a child after worshiping Varun god and the god had asked him for a vow. After the child had born, the king forgot his vow and also delayed even after the reminder; but one day Varun god again reminded the king of the sacrifice. still, he neglects and one day the child goes in the jungle and the king becomes seriously ill. Afterwards his son learns righteousness and saves his father from death.
Sadacharane Kalyan
by Mukesh NadanThis is a story of a king who had abandoned his wife and children because of their sickness. They are rescued by a Brahmin. He took care of them but a son dies and lives again miraculously. This son later gains the kingdom back from the enemies and saves his father from death. The father later comes to know that he is his own son and feels ashamed for what he had done.
Sadhanatai Aamate
by Leela PatilAs a confidante and companion of Baba Amte, she lived like his shadow for over six decades. A social activist in her own right, she stood out as a role model with her compassion for the poor, dispossessed and the ailing. Immediately after marriage Baba decided to give up legal practice and stay in the Dalit colony of outcasts in Warora, where there was a common kitchen. Born on May 5, 1926, in an orthodox Brahmin family of Guleshastri of Mahal. While much has been written about Baba, Sadhanatai was inseparable and faced all the struggles of his life. Through all these trying times, she never lost her smile and charm as the giver and caring person. Though frail and unassuming, her indomitable courage, as she lived with a non-conformist Baba Amte in difficult conditions; helped her serve and rehabilitate leprosy patients.
Sadhu Ani Chor
by Shivkumar BaijalThis is a story of a man who was a robber and wanted to become a sage so that he can rob the king. He becomes a sage and later he is transformed into a good man. He gives away the thought of robbing and continues to be a sage throughout his life.
Sadu
by Pra. G. SahasrabuddheThis is a story Monkey and birds. In winter on a conversation of monkey and birds. how monkey teaches a lesson to birds. read story what happens next.
Sagali Ghare Devachi
by Shekhar ShiledarOne day Shekh Chilli was in sleep and he heard some boys talking about him and saying this is Shekh Chilli’s house. He thought to himself how much famous I am. But his father was a Kazi and taught everybody to say that all their property belongs to God. So they again said this is Allah’s house and we are his people. Shekh chili becomes angry and threatens these boys and says this is my house my father has built it.
Sahakar class 11 - Maharashtra Board: सहकार इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसहकार इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. आपल्या सभोवताली सजीव सृष्टीमध्ये सहकार दिसून येतो. उच्च माध्यमिक स्तरावर ‘सहकार' या विषयाची निवड कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी प्रथमत: करतात. सहकार ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा योग्य आणि सुसंबंध पद्धतीने या पुस्तकात समावेश केलेला आहे. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहकाराचा इतिहास, सहकारी संस्थेची स्थापना, विविध व्यवसाय संघटना, सहकाराची तत्त्वे, सहकारी संस्थांचे महत्त्वाचे प्रकार इ. बाबत ज्ञान मिळवून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करता यावा, यासाठी 'सहकार' विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना सहज व सोप्या भाषेत करण्यात आली आहे.
Sahakar Class 12 - Maharashtra Board: सहकार इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneशैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता १२ वी कला व वाणिज्य शाखेसाठी ‘सहकार’ या विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक आहे. सहकाराचे मानवी समाजजीवनातील महत्त्व लक्षात घेऊन इयत्ता ११ वी मध्ये सहकाराचे प्राथमिक स्वरूपातील ज्ञान अभ्यासले आहे. त्यावरच आधारित इयत्ता १२ वीच्या अभ्यासक्रमात सहकारी संस्थांचे संघटन, सचिवाचा पत्रव्यवहार, सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, सहकारी बँकांचा अभ्यास, सहकार शिक्षण व प्रशिक्षण आणि सहकार क्षेत्रापुढील आव्हाने हे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. या विषयाच्या घटकांची मांडणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० व नियम १९६१ च्या अनुषंगाने करण्यात आली आहे. या कायद्यात वेळोवेळी दुरूस्त्या झाल्या असून ९७ वी सुधारणा व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम २०१३ अन्वये अनेक दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. या सुधारणांचा व दुरूस्त्यांचा विचार अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
Sahitya Sanvad Bhag 2 SYBA - RTMNU: साहित्य संवाद भाग २ बी.ए. द्वितीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Pradip Vitalkar Dr Zulfi Shaikh Dr Indrajit Akshay Kumar Kale Dr Pradip Vi Kaleविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार ‘साहित्य संवाद' हे बी. ए. भाग-२ या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संवाद' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.
Sahitya Sanvad Bhag 3 TYBA - RTMNU: साहित्य संवाद भाग 3 बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Pradip Vitalkar Dr Zulfi Shaikh Dr Indrajit Akshay Kumar Kale Dr Pradip Vi Kaleविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार साहित्य संवाद' हे बी. ए. भाग-३ (आवश्यक मराठी) या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केलेले पाठ्यपुस्तक आपल्या स्वाधीन करताना मनोमन आनंद होत आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. तशा प्रकारची पाठ्यपुस्तके यापूर्वीही विद्यापीठाने प्रकाशित केली आहेत. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संवाद: भाग-३' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.
Sahitya Siddhant: साहित्य-सिद्धान्त
by Dr S. G. Malsheरेने वेलेक आणि ऑस्टिन वॉरन लिखित “Theory of Literature” या ग्रंथाचे भाषांतर डॉ. स. गं. मालशे यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. साहित्य-सिद्धान्त या पुस्तकात साहित्याची प्रकृती आणि प्रयोजन यांच्या चर्चेने ग्रंथाचा प्रारंभ होतो. साहित्यसिद्धान्त, साहित्येतिहास आणि साहित्यसमीक्षा या परस्परावलंबी प्रक्रियांतील भेद विशद केला आहे. सापेक्षतावाद आणि निरपेक्षतावाद हे दोन्ही समीक्षेच्या संदर्भात चुकीचे असून साहित्येतिहासापासून समीक्षेची फारकत करणे अशक्य आहे, ही गोष्ट आवर्जून मांडण्यात आली आहे. चरित्र, मनोविज्ञान, समाजविज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा साहित्याशी असलेला संबंध, तसेच पंचकलांच्या क्षेत्रांतील आंदोलनांचा साम्यसंबंध यांचा विचार बाह्यकेंद्री म्हणून गौण ठरविण्यात आलेला आहे. ‘साहित्यकृतीच्या अस्तित्वाचे स्वरूप’ या समस्येपासून अंतःकेंद्री विचाराला प्रारंभ होतो. श्रुतिसुभगता, लयबद्धता, प्रतिमासृष्टी, शैली, कथात्मक साहित्याचे स्वरूप आणि साहित्यप्रकार यांचे विवेचन झाल्यानंतर या सर्वांचे फलित असे मूल्यमापनविषयक महत्त्वाचे प्रकरण येते. या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण साहित्येतिहासाच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपावर प्रकाश टाकण्यासाठी व्यतीत झालेले आहे.